चांगले पालकत्व म्हणजे काय?

चांगले पालकत्व म्हणजे काय?
मुलांच्या खाण्यापिण्याची चांगली काळजी घेणे?
मुलांचा शैक्षणिक विकास साधण्यास मदत करणे?
मुलांना काही कमी पडू न देणे?
एवढे करणे म्हणजेच पालकत्व आहे का?
का आणखी काही?

पालकत्व म्हणजे मुलांचे फक्त भौतिक पालनपोषण नाही. त्यांचे भावनिक पालनपोषण ही तितकेच महत्वाचे आहे. ह्या कौशल्यपूर्ण पालकत्वाची गरज मुलांच्या पौगंडावस्थेत, म्हणजे ज्याला आपण टीनएज असे म्हणतो तेव्हा, सर्वात जास्त असते.
मुले जेव्हा पौगंडावस्थेत प्रवेश करतात तेव्हा ती ना धड लहान असतात ना प्रौढ. बाहेरचे जग त्यांना खुणावत असते. घरातले संस्कार, मित्रमैत्रिणीकडून नकळत पडणारा दबाव (ज्याला आपण पीअर प्रेशर असे म्हणतो), मित्रमैत्रिणींनी आपल्याला स्वीकारावे म्हणून होत असलेली मानसिक धडपड, बाहेरच्या जगातल्या नवीन गोष्टींविषयी वाढत असलेली नैसर्गिक उत्सुकता ह्या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या मनात एक भावनांचा कल्लोळ माजलेला असतो.
शरीरातही खूप बदल होत असतात. लैंगिक जाणीवा आकार घेऊ लागतात. हे सर्व बदल पालकांकडून योग्य रितीने हाताळले गेले नाही तर मुले घडण्याच्या ऐवजी बिघडण्याची शक्यता जास्त असते. शारिरिक किवा बौध्दिक न्यूनगंड, लैंगिक सुखाची उत्सुकता, व्यसन करण्याची इच्छा ह्या भावना पौगंडावस्थेत उसळी मारत असतात. हे कमी की काय म्हणून पुढील आयुष्यातल्या उपजीविकेसाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे योग्य करिअरची निवडही ह्याच वयात करावी लागते. आतून वादळ आणि बाहेरून संघर्ष अशा अवघड परिस्थितीला तोंड देता देता मुलांची दमछाक होते. पालक ही गोंधळून जातात. अशा वेळी आपण पालक म्हणून कमी पडू ही भिती वाटायला लागते. घरात पालक आणि मुलांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. संघर्षाच्या ठिणग्या पडायला सुरू होतात.
मुलांचा हा पौगंडावस्थेतला आव्हानात्मक वाटणारा काळ  पालक आणि मुले ह्या  दोघांसाठी सुखद आणि आनंददायी झाला तर घरात मुलांच्या संपूर्ण वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. ह्या वातावरणाचा एक सकारात्मक परिणाम मुलांवर होऊन ती पुढे जाऊन जबाबदार प्रौढ बनतात.
ह्यासाठी पालक आणि मुलांमध्ये “सुसंवाद” असणे फार आवश्यक आहे. ह्या सुसंवादामुळे दोघांमधली दरी कमी होण्यास मदत होते. हा सुसंवाद अतिशय कौशल्याने झाला तर त्याचे चांगले परिणाम दिसून पालक आणि मुले दोघे ही तणावमुक्त होतात.
हा सुसंवाद कशा पध्दतीने साधावा, जबाबदार आणि सुजाण पालकत्व म्हणजे नेमके काय, न्युरोसायन्सच्या मदतीने मुलांच्या पौगंडावस्थेतल्या स्फोटक परिस्थितीवर कशी मात करावी ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तसेच पालक व मुले ह्यांचे नाते सुदृढ आणि मधूर करण्यासाठी Seekhlo.com  ह्यांनी “communicating with teenagers ” हा एक तासाचा मार्गदर्शक ऑनलाईन कोर्स तयार केला आहे.