तुमच्या चिमुकल्याचा स्वभाव माहितीये?

अगदी लहान वयात असणारं मूल कधी किरकिर करतं तर कधी मस्त मजेत पडून राहतं. काही मुलं रडकी असतात तर काही मुलांना सतत राग येतो. बाहेर कुठं नेल्यावर तर त्यांचं कौतुक करावं तर नेमकी आपल्याला तोंडघशी पाडतात. अशा वेळी पालक म्हणून आपला गोंधळ उडतो. त्यातच आपले पालक, नातेवाईक, शेजारीपाजारी सगळे मिळून काही न काही सूचना देत असतात. एकाची सूचना ऐकून तसं करायला जावं तर आपलं मूल त्यावर भलतंच react होतं. त्यांच्या वागण्याचा अर्थच लावता येत नसतो.
हे सगळं कशामुळं होतं माहितीये का? आपल्याला वाटतं लहान मुलांना कुठला आलाय स्वभाव? लहान मुलं म्हणजे मातीचे गोळे. जसा आकार देऊ घडतील. मोठं होता होता स्वभाव वगैरे ठरत जातात पण तसं नाहीये. मोठ्या माणसांचे स्वभाव आणि त्यांचे काही तरी गुणधर्म वैशिष्ट्य असतात तसंच लहान मुलांचेही स्वभाव असतात. अगदी जन्माला आल्यापासूनच. म्हणूनच त्यांच्या वागण्यानं आपण दरवेळी चकित होतो. पण जर आपल्याला आपल्या चिमुकल्वयाचे म्हणजेच ० ते 3 वयोगटातल्या मुलांचे स्वभाव लक्षात आले. त्यांच्या टेम्परामेंटचा पॅटर्न लक्षात आला तर? आपलं मूल कसं आहे? ते असंच का वागतं ? कोणते गुण दाखवतं ? त्याला पालक म्हणून कसा प्रतिसाद द्यायचा? या सगळ्याचीच छान मदत होईल. इतकंच नाही तर आपल्याला त्यांच्याशी कसं वागायचं- बोलायचं, त्यांच्या अॅक्शनवर आपली काय रिअॅक्शन द्यायची हे ठरवणं किती सोपं होईल ना!
पण असं मार्गदर्शन कुठं मिळणार? आपलं लहान मूल सांभाळून हे माहित करून घेणं शक्य आहे का? तर अगदी घरच्या घरी आपल्याला या मार्गदर्शनाचा आणि त्यातून मिळणाऱ्या माहितीचा वापर आपल्या मुलांच्या संगोपनासाठी करता येणं शक्य आहे.
तेही बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. भूषण शुक्ल यांच्याकडून मार्गदर्शन मिळणार. www.seekhlo.com च्या १ तासाच्या online कोर्सद्वारे आपण लहान मुलांचे टेम्परामेंट (स्वभाव) समजून घेऊ शकतो. हा कोर्स मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही भाषेत उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी
मराठी : https://www.seekhlo.com/catalogue/childhood-temperament-Mr/
English : https://www.seekhlo.com/catalogue/childhood-temperament-En/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *