टीनेजर्सचे प्रश्न सोडवण्याच्या ७ टिप्स!

मुलं वयात येऊ लागली की त्यांच्या आणि पालकांच्या दोघांच्याही आयुष्यात उलथापालथ सुरु होते. किशोरावस्थेत भावनांचा कॅलिओग्राम सतत वर खाली होत राहतो. ही फेजच मुळी मोठी आव्हानात्मक असते. पालकांना मुलांना समजून घ्यायचं असतं आणि सोबतही करायची असते पण ते गोंधळलेले असतात. शिवाय याच काळात मुलांचं स्वतःचं भावविश्व वाढलेलं असतं. अलीकडच्या काळात तर सोशल मीडियामुळे मुलांना भरपूर एक्स्पोजर उपलब्ध झालं आहे. त्यामुळं त्यांचे प्रश्न भलतेच गुंतागुंतीचे झाले आहेत. अशा वेळी पालक म्हणून आपण काही सांगायला, बोलायला गेलो कीमुलांना मात्र तो आपला भोचकपणा वाटतो. अनेकदा त्यांच्या आजच्या प्रश्नांकडे पालक स्वतःच्या लहानपणीच्या अनुभवावरून सल्ले किंवा उपाय सुचवतात. जे अर्थातच मुलांना पटणारे नसतात.

काही वेळा मुलांना गरज असली तरी आई बाबांची मदत नको असते. अशी परिस्थिती ओढावली की पालक अक्षरशः हतबल होतात. काय केल्यानं मुलांची समस्या ही सुटेन असं त्यांना वाटतं?

काही बाबतीत पालकांनी समजून घेण्याची गरज आहे तर काही बाबतीत आपल्या मुलांनाच परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम करण्याची गरज आहे. टिनेजर्सशी परिणामकारक संवाद कसा साधायचा हे सांगणाऱ्या
Seekhlo च्या कोर्समध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळतीलच पण खाली दिलेल्या सात टिप्स जरूर वापरून बघा.

१. प्रोब्लेम ओळखणे- बऱ्याचदा मुलांना त्यांचा प्रोब्लेमच लक्षात येत नसतो आणि मग नुसतीच चिडचिड होत राहते. तेव्हा मुलांना आधी प्रोब्लेम ओळखायला शिकवणं गरजेचं आहे. सध्या काय स्थिती आहे आणि त्यांना नेमकं काय हवं आहे हे विचारा. शिवाय समस्येकडे सकारात्मकतेनं पाहायला शिकवा.

२. फोकस- व्यक्ती किंवा समस्येवर लक्षकेंद्रित करण्यापेक्षा मुलांना इशुवर फोकस करायला शिकवणं महत्त्वाचं आहे. यामुळं कुठल्याही नैराश्येत न अडकता ते स्वतःच धीरानं त्यांच्या प्रोब्लेमचा सामना करू शकतात.

3. ऐकणे- कुठल्याही समस्येचं निम्मं सोलूशन म्हणजे मोठे जे सांगत आहेत ते नीट ऐकण्यात आहे. न कटकट करता, भांडता मुद्दा ऐकून घ्यायला शिकवणं. मला गरज आहे, मला हवं आहे, मला काहीतरी वाटतंय असं म्हणायला सांगा आणि फरक बघा.

४. सोलूशन शोधणं- आपल्या मुलांबरोबर बसा आणि त्यांच्याशी उपायांच्या अनुषंगाने चर्चा करा. उलट त्यांनाच काय काय पर्याय दिसताहेत हे पाहण्यासाठी प्रोत्साहन द्या. आधीच्या अनुभवातून काही मार्ग काढता येईल का हे मुलांनाच विचारा.काही वेळा मुलांचे उपाय प्रॅक्टिकल नसतील. मात्र त्यावर थेट काट मारण्याऐवजी त्यांना वेगवेगळे उपाय सुचवण्यास उद्युक्त करा.

५. सोलूशन पडताळून पाहणं- मुलांनी जो मार्ग सुचवला आहे तो कितपत योग्य आहे. त्याचे भले बुरे काय परिणाम होतील हेही तपासण्यासाठी मुलांना सुचवा.

६. अंमलबजावणी करणं- मुलांनी जो उपाय सुचवला आहे तो आता प्रत्यक्षात कसा आणायचा यासाठी मुलांना प्रेरणा द्या. उपायाच्या दिशेनं त्यांच्याशी संवाद साधा.

७. आउटकम वर पुनर्विचार करणं- सरतेशेवटी समस्या ओळखून जो उपाय केला आहे त्यातून नेमकं काय साध्य झालं, मुलांचा प्रश्न कितपत सुटला, त्यातून नवं काय काय घडलं असं सर्व बाजूंनी विचार करण्यास मुलांना सुचवा.

यातून मूल स्वतःच स्वतःच्या प्रश्नाकडे पाहायला शिकेल. खचून न जाता त्यातून मार्ग काढायला देखील स्वतःच शिकेल. मुलांशी संवादाची कला तुम्हाला शिकायची असेल तर आजचा Seekhlo वरचा हा The art of communicating with teenagers
हा कोर्स करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *