विवेकी स्व-व्यवस्थापनाचा कोर्स (REBT) - डॉ. अंजली जोशी, समुपदेशन मानसोपचारतज्ज्ञ (REBT मध्ये Ph.D) द्वारे

नवीन विचार भावना व वर्तनात स्वत:ला प्रशिक्षित करा आणि मग बघा काय बदल घडतो ते!

भाषा - मराठी
कालावधी - १५ तास
विवेकी स्व-व्यवस्थापनाचा कोर्स  (REBT) - डॉ. अंजली जोशी, समुपदेशन मानसोपचारतज्ज्ञ (REBT मध्ये Ph.D) द्वारे
    1. चित्तवेधक व्हिडीओ
    2. झटपट प्रश्न
    3. उपयुक्त सराव
    4. गृहपाठ
    5. सर्टिफिकेट

Rs 5,499 Rs 7,499

( inclusive of gst )

  • Share link with social media

हा कोर्स का करायचा?

वारंवार अस्वस्थ करणारे स्वत:चे विचार बदलण्याची तुम्हाला इच्छा आहे का?

संकटांशी सामना करताना तणाव कमी करणं तुम्हाला शिकायचं आहे का?

चिंता, क्रोध, नैराश्य, अपराधीपणा अशा भावनांवर तुम्हाला विजय मिळवायचा आहे का?

या प्रश्नांची उत्तरं ‘हो’ असतील तर Seekhlo तुम्हाला नक्कीच मदत करेल. आमचा विवेकी स्व-व्यवस्थापनाचा ऑनलाइन कोर्स केलात तर अविवेकी दृष्टिकोन व विचार कसे शोधायचे व त्या जागी विवेकी दृष्टिकोनांची प्रतिष्ठापना कशी करायची हे तुम्हाला कळेल. डॉ अंजली जोशी यांनी तयार केलेल्या या कोर्समध्ये तुम्हाला Rational Emotive Behaviour Therapy- REBT म्हणजेच विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राची ओळख करून दिली जाईल.

या कोर्सची विभागणी ६ प्रमुख विभागांत केली आहे. त्याद्वारे पायरीपायरीने व टप्प्याटप्प्याने तुम्हाला विवेकी स्व-व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळत जाईल. दैनंदिन जीवनातल्या अनेक समर्पक प्रसंगातून हा विषय सोप्या भाषेत उलगडून दाखवला आहे. यात चित्तवेधक व्हिडिओज् आहेत, झटपट प्रश्न आहेत, उपयुक्त सराव आहेत. त्यामुळे तुम्ही हा विषय अगदी सहजपणे व स्वत:च्या वेगाने ग्रहण करू शकाल.

चला तर मग, Seekhlo.com या संकेतस्थळाला भेट द्या. विवेकी स्व-व्यवस्थापनाच्या  कोर्ससाठी नोंदणी करा आणि नवीन विचार, भावना व वर्तन स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. खात्री बाळगा की हा कोर्स तुमच्या आत्मविकासाच्या मार्गातला एक महत्वाचा वळणबिंदू ठरेल.


कोर्स कोणासाठी आहे?

हा कोर्स सर्वांसाठी खुला आहे. विशिष्ट वयाची किंवा व्यवसायाची अट नाही. तुम्ही गृहिणी असाल नाहीतर विद्यार्थी; सेवानिवृत्त असाल किंवा व्यावसायिक, तुम्हाला आत्मविकास करून घ्यायचा असेल व जीवन विवेकी व अर्थपूर्ण रीतीने जगण्याची इच्छा असेल तर तुम्हाला या कोर्सचा नक्कीच फायदा होऊ शकेल. 


कोर्सचे विभाग

विभाग - विवेकी स्व-व्यवस्थापन- ओळख   

विभाग २- भावनिक अस्वस्थतेचे विश्लेषण

विभाग ३- अविवेकी दृष्टिकोन ओळखणे 

विभाग ४- अविवेकी दृष्टिकोनांची उलटतपासणी- भाग १  

विभाग ५- अविवेकी दृष्टिकोनांची उलटतपासणी- भाग २ 

विभाग ६- विवेकी जीवनासाठी तंत्रे


कोर्सची वैशिष्ट्ये

सर्वसमावेशक विभाग

पायरीपायरीने मार्गदर्शन

दैनंदिन जीवनातील उदाहरणे

विवेकी तंत्रांची ओळख

चित्तवेधक व्हिडिओज्

महत्वाच्या मुद्द्यांवर झटपट प्रश्न

नावीन्यपूर्ण अ‍ॅक्टिव्हिटीज

सखोल उलटतपासणीची प्रॅक्टिस

प्रत्येक विभागाच्या शेवटी ६ समर्पक सराव

१२ लक्ष्यवेधक गृहपाठ- श्रवण, लेखन, वाचन, कृती       

तज्ज्ञ

डॉ. अंजली जोशी
डॉ. अंजली जोशी
डॉ अंजली जोशी या व्यावसायिक मानसोपचारतज्ज्ञ असून समुपदेशन मानसशास्त्रात एम.फील व पी.एच.डी. आहेत व मुंबईतील नामांकित मॅनेजमेंट इंस्टीट्यूटमध्ये मनुष्यबळ (HR) या विषयाच्या ‘Professor & Associate Dean’ म्हणून कार्यरत आहेत. अनेक संस्था व कंपन्यांशी त्या कन्सल्टिंग सायकॉलॉजिस्ट’ म्हणून संलग्न असून मानसशास्त्र व व्यवस्थापन या विषयांवर त्यांनी देशभरात अनेक व्याख्याने व कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांची आजवर आठ पुस्तके प्रकाशित झाली असून विविध मासिके, नियतकालिके, नॅशनल व इंटरनॅशनल जर्नल्समध्ये शंभरच्यावर लेख व शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या ‘मी अल्बर्ट एलिस’ या पहिल्या कादंबरीला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून ‘विरंगी मी विमुक्त मी’ या कादंबरीला महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘ललित ग्रंथ पुरस्कार’ तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘कादंबरी पुरस्कार’ मिळाला आहे. याशिवाय, ‘अल्बर्ट एलिस विचारदर्शन’, ‘विवेकी पालकत्व’, ‘लक्षणीय ५१’, ‘सायकोस्क्रोप’, ‘I am Albert Ellis’, ‘REBT Integrated’ ही त्यांची मानसशास्त्रावरील प्रकाशित झालेली इतर पुस्तके आहेत. त्यांच्या लिखाणाचे आजवर तीन भाषांत अनुवाद झाले आहेत.

You might also like -

product image
Rational Self Management (REBT) - By Dr. Anjali Joshi, Counselling Psychologist (Ph.D in REBT)