आपल्या मुलांचे करिअर बडी व्हा!

आपल्या मुलाच्या करिअर निर्णय प्रक्रियेत सोबती होणे ही पालकांची एक महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी सक्षम व्हा आणि आपल्या मुलांचे करिअर बडी बना!

पालकांसाठी ऑनलाईन कोर्स 
3 भाषांमध्ये उपलब्ध
कालावधी - ३ तास 
आपल्या मुलांचे करिअर बडी व्हा!
    1. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध
    2. ॲनिमेटेड व्हिडीओ
    3. परस्परसंवादी उपक्रम
    4. प्रमाणपत्र

Rs 1,499 Rs 2,499

( inclusive of gst )

  • Share link with social media

या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकाल?

मुलांचं करिअर हे केवळ १० वी किंवा १२वी मध्ये एकदाच निवडलेला पर्याय नाही. ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. करिअर बाबत सतत होणाऱ्या बदलांमुळे पालकांनी करिअर निवड प्रक्रियेमध्ये आपल्या मुलाचे सोबती बनणे आणि या प्रवासाचा आनंद घेणे महत्त्वाचे आहे.

३ तासांच्या या कोर्सद्वारे आपण करिअरच्या विविध क्षेत्रांबद्दल आणि प्रत्येक क्षेत्रात उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संधींबद्दल अधिक जाणून घ्याल. तसेच आपल्या मुलाची आवड आणि अभिक्षमता विनामूल्य करिअर परीक्षणाच्या मदतीने आपण जाणून घेऊ शकाल. आणि व्हिजन बोर्ड तयार करण्यासारख्या एका कल्पक कृतीतून मुलांच्या करिअरची आखणी करण्यास हातभार लावू शकाल.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुम्ही, मुलांच्या आनंद आणि यशाच्या मार्गावरील करिअर बडी बनाल.

हे प्रशिक्षण कशासाठी?

पालक, शिक्षक आणि मार्गदर्शक हे मुलांच्या आयुष्यातील हितचिंतक असतात. पण २१ व्या शतकातील नवीन आव्हानांमुळे मुलांचे करिअरचे मार्ग हे त्यांच्या स्वतःच्या मार्गांपेक्षा खूपच भिन्न आहेत. कल्पना करा, जर, या संदर्भात पालक सक्षम झाले तर मुलांच्या करिअर निवडीच्या प्रक्रियेला अगदी इयत्ता ८वी पासून देखील सुरुवात होऊ शकेल. प्रत्येक मूल वेगळे असते, प्रत्येक मुलात वेगवेळ्या क्षमता असतात. मुलांच्या या क्षमता ओळखून त्या वृद्धिंगत करण्यासाठी पालकांना या कोर्सची नक्की मदत होईल.

म्हणूनच पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि या वयोगटाबरोबर काम करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे!

कोर्स मोड्यूल्स

  • करिअर : एक प्रक्रिया आहे, घटना नव्हे
  • करिअर मॅजिक फ्रेमवर्क : करिअर नियोजनाचे एक उपयुक्त साधन
  • करिअर संदर्भात ७ क्षेत्रांविषयी जाणून घेणे
  • आवड आणि अभिक्षमता यांची शैक्षणिक संधींशी सांगड घालणे
  • स्व अहवाल (SWOT Analysis) तयार करणे
  • SMART ध्येय ठरविणे आणि त्याचे नियोजन करणे
  • करिअर व्हिजन बोर्ड तयार करणे
  • वेळेचे नियोजन करणे
  • सकारात्मक ताणाचे महत्त्व समजून घेणे

  • वैशिष्ट्ये

    • वेळ : ३ तास
    • भाषा : मराठी
    • प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत
    • व्हिडीओज
    • उपक्रम
    • प्रश्नोत्तरे
    • डाऊनलोड साहित्य
    • संदर्भ साहित्य
    • मोठ्या संस्थांसाठी राबविण्यास, 'ऍडमिन पॅनल' सुविधा

    तज्ज्ञ

    डॉ. श्रीराम गीत 
    डॉ. श्रीराम गीत 
    डॉ. गीत करिअर समुपदेशन क्षेत्रात ‘पितामह भीष्म’ म्हणून ओळखले जातात. गेल्या ४0 वर्षातील बदलत्या करिअर प्रवाहाचे ते साक्षीदार आहेत. त्यांची करिअर संदर्भात असलेली अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. डॉ. श्रीराम गीत आजही करिअर करू इच्छिणाऱ्या जवळपास तिसर्‍या पिढीला तितक्याच संयुक्तिक पद्धतीने आणि अचूकतेने मार्गदर्शन करीत आहेत.
    डॉ. शिरिषा साठे 
    डॉ. शिरिषा साठे 
    डॉ. साठे या एक प्रसिद्ध समुपदेशक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की उपचारात्मक हस्तक्षेप मर्यादित कालावधीसाठी, नेमका आणि प्रभावी असावा. समस्येच्या मुळाशी जाणे आणि समोरील व्यक्तीला समस्यांची आणि आयुष्याची सुत्रे स्वत:च्या हातात घेण्याइतके सक्षम करणे यांवर त्यांचा भर असतो. वैद्यकीय डॉक्टर असलेल्या आणि त्यासोबत चिकित्सा मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. साठे या शरीरशास्त्र आणि वर्तणुकीशी संबंधित न्यूरोसायन्स व मानसशास्त्र यात समन्वय नि संतुलन साधतात. किशोरावस्थेतील समस्यांवर विशेष लक्ष देण्याबरोबरच व्यसनमुक्ती, कौटुंबिक हिंसाचार, वैवाहिक आणि विवाहपूर्व समुपदेशन या क्षेत्रातही त्या अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत कार्यरत आहेत.
    शीतल बापट 
    शीतल बापट 
    एस.ए.एफ. इंडियाच्या सह-संस्थापक, ‘राईट टू राईट एज्युकेशन’ या उद्देशाने करिअर मार्गदर्शन आणि जीवन कौशल्य (life skills) या क्षेत्रात ५ राज्यांमधील १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांसह ४०,००० हून अधिक सेवेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. तरुणांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक अनुभवाची आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे २० वर्षाच्या पालकत्वाच्या अनुभवाची जोड त्यांच्या कामाला आहे.

    You might also like -

    product image
    टीन टॉक (मराठी)

    किशोरवयामध्ये मेंदूचे कार्य वेगळ्या पद्धतीने चालते! आपल्या किशोरवयीन मुलांना समजून घ्या, समानुभूतीने वागा, त्यांच्यासोबत अधिक चांगला संवाद साधा

    product image
    Aptitude & Interest Test For Students

    Over 1 crore students have made informed career choices with this test. discover your interests & aptitudes and embark on your career journey.