टीन टॉक (मराठी)

जिंका, कला- किशोरवयीन मुलांसोबत संवाद साधण्याची!

पालकांसाठी ऑनलाईन कोर्स 
3 भाषांमध्ये उपलब्ध
कालावधी - १ तास
टीन टॉक (मराठी)
  1. इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध
  2. ॲनिमेटेड व्हिडीओ
  3. परस्परसंवादी उपक्रम
  4. प्रमाणपत्र

Rs 699 Rs 1,499

( inclusive of gst )

 • Share link with social media

या प्रशिक्षणातून तुम्ही काय शिकाल?

किशोरावस्थेतील वागणूक बऱ्याचदा गोंधळात टाकणारी असते. कधीकधी ते अतिशय परिपक्वपणे वागतात, तर कधीकधी आक्षेपार्ह, बेजबाबदार, लहरी, रागीट आणि कल्पना ही करता येणार नाही असे वागताना दिसतात. मुलांसोबत मैत्रीपूर्ण संवाद साधण्याचा पालक अनेकवेळा प्रयत्न करतात आणि ते प्रयत्न बऱ्याचदा फसतात. अशावेळी त्यांना असहाय्य वाटते. बहुतेक वेळा अशा पाठशिवणीच्या खेळानंतर हमखास कानावर येणारी वाक्य म्हणजे “हल्लीची मुलं ना… कठीण आहेत.” किंवा “माझे पालक कुठल्या जगात राहतात कळत नाही.”

पालकांना मुलांच्या अशा वागणुकीचा त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होईल अशी चिंता भेडसावत असते. तथापि, या अशा वर्तनाचे शास्त्रीय कारण समजल्यास पालक आणि मुलांमधील संवाद अर्थपूर्ण आणि विधायक होऊ शकतो. शिवाय यामुळे त्यांच्या निरोगी वाढ आणि विकासासाठी एक अनुकूल वातावरण देखील तयार होते. सुसंवाद ही दृढ नातेसंबंधांकडे नेणारी पहिली पायरी आहे.

एका तासाच्या या छोट्या कोर्सद्वारे आपण किशोरांचा मेंदू कसे कार्य करतो आणि किशोरांशी प्रभावीपणे संवाद कसा साधायचा हे जाणून घेऊ शकाल. म्हणूनच पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि या वयोगटाबरोबर काम करणाऱ्या सर्वांचे स्वागत आहे!

कोर्स मोड्यूल्स

 • किशोरावस्थेतील मेंदूची शास्त्रीय माहिती घेणे
 • किशोरांमधील धोकादायक / आवेगपूर्ण वर्तन समजून घेणे
 • किशोरावस्थेत असलेली स्वातंत्र्याची गरज समजून घेणे
 • कृती आणि त्याचे परिणाम याबाबत जागरूकता निर्माण करणे
 • स्व-नियंत्रण आणि वेळच्या नियोजनाचे कौशल्य विकसित करणे

 • वैशिष्ट्ये

  • वेळ : १ तास
  • भाषा : मराठी
  • प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत
  • व्हिडीओज
  • उपक्रम
  • प्रश्नोत्तरे
  • डाऊनलोड साहित्य
  • मोठ्या संस्थांसाठी राबविण्यास, 'ऍडमिन पॅनल' सुविधा

  तज्ज्ञ

  डॉ. शिरिषा साठे 
  डॉ. शिरिषा साठे 
  डॉ. साठे या एक प्रसिद्ध समुपदेशक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की उपचारात्मक हस्तक्षेप मर्यादित कालावधीसाठी, नेमका आणि प्रभावी असावा. समस्येच्या मुळाशी जाणे आणि समोरील व्यक्तीला समस्यांची आणि आयुष्याची सुत्रे स्वत:च्या हातात घेण्याइतके सक्षम करणे यांवर त्यांचा भर असतो. वैद्यकीय डॉक्टर असलेल्या आणि त्यासोबत चिकित्सा मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. साठे या शरीरशास्त्र आणि वर्तणुकीशी संबंधित न्यूरोसायन्स व मानसशास्त्र यात समन्वय नि संतुलन साधतात. किशोरावस्थेतील समस्यांवर विशेष लक्ष देण्याबरोबरच व्यसनमुक्ती, कौटुंबिक हिंसाचार, वैवाहिक आणि विवाहपूर्व समुपदेशन या क्षेत्रातही त्या अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत कार्यरत आहेत.
  शीतल बापट 
  शीतल बापट 
  एस.ए.एफ. इंडियाच्या सह-संस्थापक, ‘राईट टू राईट एज्युकेशन’ या उद्देशाने करिअर मार्गदर्शन आणि जीवन कौशल्य (life skills) या क्षेत्रात ५ राज्यांमधील १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांसह ४०,००० हून अधिक सेवेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. तरुणांना आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या व्यावसायिक अनुभवाची आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे २० वर्षाच्या पालकत्वाच्या अनुभवाची जोड त्यांच्या कामाला आहे.

  You might also like -

  product image
  आपल्या मुलांचे करिअर बडी व्हा!

  आपल्या मुलाच्या करिअर निर्णय प्रक्रियेत सोबती होणे ही पालकांची एक महत्त्वाची भूमिका आहे. यासाठी सक्षम व्हा आणि आपल्या मुलांचे करिअर बडी बना!

  product image
  Aptitude & Interest Test For Students

  Over 1 crore students have made informed career choices with this test. discover your interests & aptitudes and embark on your career journey.