कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा प्रतिबंध -- कायदा आणि त्यापलीकडे (Basic Level)
POSH कायदा २०१३, वरील महाराष्ट्र राज्य महिला आयोग द्वारा प्रमाणित ऑनलाईन अभ्यासक्रम
- इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषेत उपलब्ध
- ॲनिमेटेड व्हिडीओ
- परस्परसंवादी उपक्रम
- प्रमाणपत्र
Rs 499
Rs 785
( inclusive of gst )
अभ्यासक्रमाची माहिती
भारत सरकारने, ‘कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ पारित केला जो POSH कायदा म्हणून ओळखला जातो. या कायद्यामुळे काम करण्याच्या ठिकाणी स्त्रियांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी संस्थेवर / कंपनीवर असते.
उच्च दर्जाचे ऑनलाइन प्रशिक्षण देणारे MSCW हे देशातील पहिले आयोग आहे. या प्रशिक्षणात एकसारखेपणा आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी MSCW ने ‘एस.ए.एफ. इंडिया अकॅडेमी’ या संस्थेबरोबर, हे प्रशिक्षण देणारा, हा ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला आहे.
POSH कायद्यानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला हा कायदा माहीत हवा. लैंगिक छळ म्हणजे नक्की काय? आणि जर लैंगिक छळ घडला तर निवारण प्रक्रिया कशी असते इत्यादी गोष्टींची माहिती या अभ्यासक्रमातून मिळते. हा अभ्यासक्रम कायद्याच्याही पलिकडे जाऊन या संबंधीची इतरही माहिती देतो. जसे की, लैंगिक छळ होण्यापूर्वीची लक्षणे किंवा एखादी व्यक्ती लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी परिवर्तन कसे घडवून आणू शकते आणि त्यातून कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, विश्वास आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये कशी रुजवली जाऊ शकतात, इत्यादी विषयसुद्धा या अभ्यासक्रमात हाताळले गेले आहेत.
हे प्रशिक्षण कशासाठी?
पॉश कायदा, २०१३ - कलम १९, कलम २४ (अ) आणि नियम १३(फ) चे अनुपालन करणारा,
राज्य सरकारद्वारा मान्यता प्राप्त एकमेव ऑनलाइन
अभ्यासक्रम:
- प्रत्येक नियोक्ता जागरूकता कार्यक्रम आयोजित करू शकेल
- सदस्य आणि कर्मचार्यांच्या संवेदनशीलतेसाठी अनिवार्य प्रशिक्षण
- राज्य सरकारद्वारा मान्यता प्राप्त प्रशिक्षण मोड्यूल्स
- प्रशिक्षण संपल्यावर तुम्हांला एमएससीडब्ल्यू कडून प्रमाणपत्र मिळेल
हे प्रशिक्षण कोणासाठी आहे?
हे प्रशिक्षण सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
कोर्स मोड्यूल्स
वैशिष्ट्ये
- वेळ : साधारण ४५ मिनिटे
- भाषा : मराठी
- प्रशिक्षण अवधी - प्रशिक्षण सुरु केल्यापासून ३० दिवसांपर्यंत असेल.
- व्हिडीओज
- उपक्रम
- स्वगत आणि अनुभव
- प्रश्नोत्तरे
- डाऊनलोड साहित्य
- संदर्भ साहित्य
- मोठ्या संस्थांसाठी देखील राबविण्यास, वापरण्यास आणि अंमलबजावणी करण्यास अत्यंत सोपे प्रशिक्षण.
“It was really eye-opening. The course is hard hitting, thought provoking and really engaging and because it was online it is very easy to access. It’s a course that that made me question all the inherent biases that all of us carry.”