कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाचा प्रतिबंध - कायदा आणि त्यापलीकडे
POSH कायदा २०१३, वरील ऑनलाईन अभ्यासक्रम

- ॲनिमेटेड व्हिडीओ
- परस्परसंवादी उपक्रम
- प्रमाणपत्र
Rs 500
Rs 500
( inclusive of gst )
भारत सरकारने, ‘कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३’ पारित केला जो POSH कायदा म्हणून ओळखला जातो. या कायद्यामुळे काम करण्याच्या ठिकाणी स्त्रियांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी संस्थेवर / कंपनीवर असते.
या प्रशिक्षणात एकसारखेपणा आणण्यासाठी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘एस.ए.एफ. इंडिया अकॅडेमी’ने हा ऑनलाइन अभ्यासक्रम तयार केला आहे.
POSH कायद्यानुसार, प्रत्येक कर्मचाऱ्याला हा कायदा माहीत हवा. लैंगिक छळ म्हणजे नक्की काय? आणि जर लैंगिक छळ घडला तर निवारण प्रक्रिया कशी असते इत्यादी गोष्टींची माहिती या अभ्यासक्रमातून मिळते. हा अभ्यासक्रम कायद्याच्याही पलिकडे जाऊन या संबंधीची इतरही माहिती देतो. जसे की, लैंगिक छळ होण्यापूर्वीची लक्षणे किंवा एखादी व्यक्ती लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी परिवर्तन कसे घडवून आणू शकते आणि त्यातून कामाच्या ठिकाणी सुरक्षितता, विश्वास आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये कशी रुजवली जाऊ शकतात, इत्यादी विषयसुद्धा या अभ्यासक्रमात हाताळले गेले आहेत.
हे प्रशिक्षण कशासाठी?
पॉश कायदा, २०१३ - कलम १९, कलम २४ (अ) आणि नियम १३(फ) चे अनुपालन करणारा ऑनलाइन अभ्यासक्रम:
- प्रत्येक नियोक्ता जागरूकता कार्यक्रम आयोजित करू शकेल
- सदस्य आणि कर्मचार्यांच्या संवेदनशीलतेसाठी अनिवार्य प्रशिक्षण
हे प्रशिक्षण सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.